कार्तिकी प्रतिष्ठान मोरगाव कर्मचार्‍यांची रचना

                                    पदसंख्या

केंद्रीय ऑफिस                     ९                   तज्ञ मंडळ

 

संपूर्ण महाराष्ट्र                     ६                  भरारी पथक

 

विभाग                                ६                  विभाग तज्ञ

 

ऑफिस क्लर्क                १६४ I १६४            जिल्हा तज्ञ

 

३५५ तालुके / महानगरे           ८६१               तालुका तज्ञ

 

३५५ तालुके / महानगरे          ११४८               तालुका सहा. तज्ञ

कार्तिकी प्रतिष्ठान मोरगाव या बहुउद्देशीय संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यात शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्यिक व वैज्ञानिक या क्षेत्रात विशेष प्राविण्य देण्यासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यात पुढीलप्रमाणे उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल.

 • प्रथम राज्यातील ३६ जिल्हे ३५५ तालुके यातून प्रत्येक गावातील इयत्ता चौथी ते बारावी या इयत्तेतील शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्यिक व वैज्ञानिक यात प्राविण्य असणार्‍या विद्यार्थ्यांचे गावातील प्रत्येक शाळेत जाऊन फॉर्म भरून घेतले जातील किंवा ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरून घेतले जातील. तसेच खुल्या गटातील वय वर्षे १८ ते ३० मधील शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्यिक व वैज्ञानिक यात प्राविण्य असणार्‍या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरून घेतले जातील.
 • क्रमवारीनुसार संस्थेमार्फत प्रथम तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे, क्रीडा स्पर्धांचे इयत्ता चौथी ते बारावी विद्यार्थ्यांचे तसेच खुला गटातील विद्यार्थ्यांचे आयोजन केले जाईल.
 • संस्थेमार्फत यातुन ठराविक शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्यिक व वैज्ञानिक यात प्राविण्य असणार्‍या विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
 •  संस्थेमार्फत राज्यात एका ठिकाणी केंद्रबिंदू मानून राज्यातील प्रत्येक तालुक्यातील शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्यिक व वैज्ञानिक यात प्राविण्य असणार्‍या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे, क्रीडा स्पर्धांचे इयत्ता चौथी ते बारावी विद्यार्थ्यांचे तसेच खुला गटातील विद्यार्थ्यांचे आयोजन केले जाईल. तसेच याठिकाणी साहित्य प्रदर्शन, सांस्कृतिक प्रदर्शन, वैज्ञानिक प्रदर्शन, कृषि प्रदर्शन व क्रीडा प्रदर्शन या प्रदर्शनाचे आयोजन केले जाईल.
 • संस्थेमार्फत यातून इयत्ता चौथी ते बारावी मधील पाच हजार विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. व या विद्यार्थ्यांना राज्यातील सहा विभागात पुढील शिक्षण मोफत देण्यात येईल. तसेच खुल्या गटातील पाच हजार विद्यार्थ्यांना बक्षिसे, प्रमाणपत्र व मानधन देऊन गौरवण्यात येईल.
 • संस्थेमार्फत निवडलेल्या पाच हजार विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण पुर्णपणे मोफत देण्यासाठी राज्यातील सहा ठिकाणी गुरुकुल स्वरुपात शाळा व कॉलेजेस ची उभारणी केली जाईल. यात प्रत्येक क्षेत्रातील विद्यार्थ्याला त्या त्या क्षेत्रात अशा प्रकारचे शिक्षण उपलब्ध करून दिले जाईल. जेणेकरून त्या विद्यार्थ्याचे त्याच क्षेत्रात  पुढील करियर घडण्यास मदत होईल.
 • संस्थेमार्फत ही प्रक्रिया दर वर्षी सुरू राहील.  यामुळे  राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संस्थेमार्फत गुरुकुल उभारले जाईल. यातून हजारो क्रिडापट्टू, कलाकार, वैज्ञानिक, डॉक्टर, वकील व इंजिनियर स्वत:च्या हिंमतीवर बाहेर पडतील.

कार्तिकी प्रतिष्ठान मोरगाव या बहुउद्देशीय संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यात शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्यिक व वैज्ञानिक या क्षेत्रात मोडणारे पुढीलप्रमाणे प्रकार असतील.

शैक्षणिक

                चौथी ते बारावी

सांस्कृतिक

                चौथी ते बारावी

                नृत्य,अभंग, गायन, कव्वाली, नाटक, कोळी गीत, भारुड, संगीत, कीर्तन, बँजो/झांज/ढोल, पोवाडा.

                खुला गट (१८ ते ३० वर्षे)

                नृत्य,अभंग, गायन, कव्वाली, नाटक, कोळी गीत, भारुड, संगीत, कीर्तन, बँजो/झांज/ढोल, पोवाडा, ऑर्केस्ट्रा, ओवी, तमाशा, गझल गीत.

साहित्यिक

                चौथी ते बारावी

                निबंध, कविता, कादंबरी, नाटक लेखन, कथा, लेख.

                खुला गट (१८ ते ३० वर्षे)

                निबंध, कविता, कादंबरी, नाटक लेखन, कथा, लेख.         

क्रीडा

                चौथी ते बारावी

                कबड्डी , टेनिस, धावणे, बॅडमिंटन, लांब उडी, फूटबॉल, कुस्ती, क्रिकेट, हॉकी.

                खुला गट (१८ ते ३० वर्षे)

                कबड्डी , टेनिस, धावणे, बॅडमिंटन, लांब उडी, फूटबॉल, कुस्ती, क्रिकेट, हॉकी.

 

वैज्ञानिक

                चौथी ते बारावी

                शोध, संशोधन.

                खुला गट (१८ ते ३० वर्षे)

                शोध, संशोधन.

संस्थेमार्फत राज्यातील प्रत्येक तालुक्यात वरील उपक्रमांचे आयोजन केले जाईल.

संस्थेचे उद्देश व कार्ये –

♠ महिला व बाल कल्याण –

  • महिलांच्या विकासासाठी व्यवसाय निगडीत प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे बाबत मार्गदर्शन करणे. (गरीब, दुर्लभ, दारिद्र्य रेषेखालील)

  • महिलांवरील आत्याचार निवारणाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करणे.

  • केंद्र सरकारच्या महिला विकासाच्या स्वाधार योजना राबविणेबाबत मार्गदर्शन करणे.

  • ३ ते ५ वयोगटातील शाळाबाहय मूला-मुलींसाठी बालवाडी व सकस आहार योजनेची माहिती देणे.

  •  निराश्रित आणि परित्यक्ता, विधवा स्त्रियांसाठी वसतिगृहाची सोय करणे, त्यांच्यासाठी उद्योगधंद्याचे मार्गदर्शन करणे व त्यांचे पुनर्वसन करणे.

  • महिला बचत गटाबाबत मार्गदर्शन करणे.

  • स्त्री भ्रूण हत्यासंबंधी जनजागृती करणे त्यास अनुसरून पथनाट्य निर्मिती करणे.

  • आदर्श महिला पुरस्कार देऊन पुरस्काराने सन्मानित करणे.

  • देवदासी महिलांचे पुनर्वसन करणे.

  • वरील सर्व उद्देश शासनाच्या संबंधित खात्याच्या पूर्व परवानगीने  राबविणेत येतील.

♠ सामाजिक –

 • सुशिक्षित युवतींसाठी उद्योगधंदा संबंधी व नोकरीविषयक मार्गदर्शन करणे.

 • समाज प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करणे.

 • मागासवर्गीय लोकांसाठी कल्याणकारी तसेच महिला व युवतींसाठी योजना राबविणे बाबत मार्गदर्शन करणे.

 • मागासवर्गीय / भटके विभुक्त तथा दुर्लक्षित प्रवर्गातील मुलांसाठी रात्रीची अभ्यासिका संधि उपलब्ध करून देणे. 

 • मागासवर्गीय लोकांसाठी सर्व साधारण अनुदानित योजने बाबत माहिती देणे.

(निवासी / अनिवासी शाळा इ.)

 • अंध, अपंग, विकलांग घटकांसाठी कल्याणकारी योजनेची माहिती देणे. (समाजातील अंध, अपंग, बहिरे,मुक इतर विकलांग झालेल्या घटकांचा विकास करून देणे.) 

 • विविध प्रवर्गातील विकलांग व्यक्तीसाठी कृत्रिम साधने/अवयव उदा. व्हील चेअर, कॅलीपर्स, तीनचाकी सायकल, बेल, लिपि साहित्य, श्रवण यंत्र इ. पुरविणे.

 • अनाथ बालकांना आश्रमाची सोय उपलब्ध करून देणे.

 • वृद्ध लोकांसाठी संपूर्णपणे निवासी व्यवस्थेसाठी कार्यक्रम राबविणे. (राहण्याची व्यवस्था करणे.)

 • समाजातील मागासलेल्या लोकांच्या राहणीमानात सुधारणा व्हावी यासाठी मार्गदर्शनपर शिबिरांचे आयोजन करणे.

 • वृद्ध लोकांसाठीचे दिवसभराचे विरंगुळा केंद्र (डे केअर सेंटर) ची माहिती देणे.

 • व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्राबाबत मार्गदर्शन करणे.

 • युवक कल्याण कार्यक्रमाची माहिती देणे व ते कार्यक्रम राबविणे.

 • पर्यावरण पुनर्निर्मिती कार्यक्रम (शिबीर कार्यक्रम) पर्यावरण जागृती याविषयी शिबिरे आयोजित करणे.

 • राष्ट्रीय पर्यावरण जागृती अभियान / पर्यावरण विषयी जनतेमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी चर्चा सत्रे, शेतकरी मेळावे, प्रदर्शने, पथनाट्य इ. कार्यक्रम आयोजित करणे.

 • ग्रामीण तंत्रज्ञान योजनेमध्ये ग्रामीण भागात सहज रित्या येणे सारखे व प्रयोगांती निष्कर्ष निश्चित झालेले / स्थानिक रित्या उपलब्ध तंत्रज्ञान वापरणारे प्रकल्प उदा. गांडूळ खत, डंप कंपोस्ट रूप वॉटर / रेन वॉटर इत्यादी योजनेबाबत मार्गदर्शन करणे.

 •  लाभार्थी संघटन यामध्ये महिला / समाजातील घटक ग्रामसदस्य यांच्याकरिता प्रबोधन, कॅम्प घेऊन त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे, शासकीय सवलत योजनेबाबत माहिती देणे.

 • सार्वजनिक सहकार्य या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील कमकुवत तसेच दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी उत्पन्न निर्मितीचे प्रस्ताव उदा. मत्स्य शेती, शेळी पालन, दूधजन्य प्राणी पालन, मेंढी पालन, आधुनिक तंत्रज्ञानाने शेती, इ. सारखे प्रकल्प राबविणे बाबत मार्गदर्शन करणे.

 • पडीक जमीन कायम स्वरूपी वृक्ष लागवडीसाठी आणणेसाठी त्या जमिनीत चार, गवत, वृक्ष लागवड, बंधारे, शेत तळे, इ. योजने बाबत मार्गदर्शन करणे.

 • शासनाच्या सर्व कृषि विषयक योजने बाबत माहिती देणे. 

 • विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणार्‍या व व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करणे.

 • सुशिक्षित बेरोजगारांसाठी उद्योग धंदा संबंधी व नोकरी विषयक मार्गदर्शन करणे.

 • राष्ट्रीय सण उदा. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी साजरे करणे, विविध महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथि करणे. (गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, शिवजयंती इ.)

 • वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करणे.

 • बाग-बगीचे, उद्याने विकसित करणेसाठी सर्वतोपरी मार्गदर्शन करणे.     

 • दलित व गलिच्छ वस्ती सुधारणा करणे व त्यांना प्राथमिक औषध उपचार उपलब्ध होणेसाठी मार्गदर्शन करणे.

 • वरील सर्व उद्देश शासनाच्या संबंधित खात्याच्या पूर्व परवानगीने राबविणेत येतील.

 

♠ शैक्षणिक-

 • विकृती झालेल्या मुलांसाठी शिक्षण, राहणे, जेवणाची व्यवस्था करणे. (अंध, अपंग, बहिरे, मुक-बधिर, मतिमंद.)

 • योग प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन करणे. (योग विद्या प्रशिक्षण केंद्र, योग विद्या वसतिगृहे निर्माण करणे.)

 • मराठी, हिन्दी भाषेच्या विकासाच्या योजनेबाबत मार्गदर्शन करणे. (मराठी, हिन्दी भाषेचे स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालयाची निर्मिती करणे.)

 • मराठी, इंग्रजी भाषेची दिवस रात्र अभ्यासिका व ग्रंथालयाची स्थापना करणे.

 • अंगणवाडी, बालवाडी, पूर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू करणे, सुरू करण्यास मार्गदर्शन करणे.

 • इंग्रजी भाषेचे लहान गटातील विद्यार्थी, कॉलेज विद्यार्थी तसेच गृहिणी व नोकरदारांसाठी विविध कोर्सेस चालविणे.

 • विद्यालयीन व महाविद्यालयीन स्थरिय विविध शाखेच्या विविध विषयांचे शिकवणी वर्ग चालविणे.

 • कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू करणे.

 • डी.एड., बी.एड. इत्यादी महाविद्यालये सुरू करणे, चालविणेस मदत करणे.

 •  वैद्यकीय सेवांशी संबंधी नर्सिंग कॉलेज, वैद्यकीय महाविद्यालये सुरू करणे, चालविणे बाबत मार्गदर्शन करणे.

 •  तंत्र शाळा, यंत्रशाळा, आय.टी.आय. सुरू करणे / मार्गदर्शन करणे.

 •  कृषि व्यवसाय उद्योगाशी संबंधित निरनिराळ्या पदवी व पदविका महाविद्यालय सुरू करणे.

 •  टायपिंग कोर्सेस, कॉम्प्युटर कोर्स सुरू करणे तसेच माहिती तंत्रज्ञान व व्यवस्थापन क्षेत्रा संदर्भि मार्गदर्शन करणे व ती महाविद्यालये सुरू करणे.

 •  समाजातील गरीब, गरजू व हुशार विद्यार्थ्यासाठी दिवस व रात्रीचे वाचनालय, ग्रंथालय, पुस्तकालय, अभ्यासिका इ. ची स्थापना करणे.

 •  प्रौढ साक्षरता प्रसार वर्ग, प्रौढ साक्षरता प्रसार, प्रचार प्रक्षिक्षण वर्ग बाबत माहिती देणे.

 •  अंध, अपंग, बहिरे, मुक-बधिर, मतिमंद मुलांसाठी शाळा सुरू करणे.

 •  एड्स ग्रस्त बालकांसाठी बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा सुरू करणे.

 •  समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक मदत मिळवून देणेबाबत मार्गदर्शन करणे.

 •  वस्तीशाळा, आश्रमशाळा, निवासी आश्रमशाळा इ. ची निर्मिती करणे.

 •  मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्ग व अपंग मुलामुलींची शैक्षणिक उन्नती होण्यासाठी निवासी शाळा व आश्रम शाळा चालविणे.

 •  इंग्रजी माध्यमांकरिता प्ले ग्रुप, फर्स्ट केजी, सेकंड केजी प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा सुरू करणे.

 •  वैद्यकीय सेवांशी संबंधित नर्सिंग कॉलेज, बी.ए.एम.एस., एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.फार्मसी, डी.फार्मसी, वैद्यकीय महाविद्यालये सुरू करणे.

 •  कृषि व्यवसाय उद्योगाशी संबंधित निरनिराळी पदवी व पदविका महाविद्यालये सुरू करणे व चालविण्यास मदत करणे.

 •  संगीत, चित्रकला, शारीरिक शिक्षण यासारख्या शिक्षण देणार्‍य महाविद्यालयाची स्थापना करणे.

 •  संगणक प्रशिक्षण, फॅशन डिझायनिंग, शिवणकाम यासारख्या विविध कलांचे प्रशिक्षण देणे.

 •  बालसंस्कार केंद्र शिक्षण देणेसाठी विविध उपक्रम राबविणे.

 •  विविध प्रदर्शनाचे आयोजन करणे. उदा. छायाचित्राचे प्रदर्शन, चित्रपट, नाटक व चित्रकला प्रदर्शन, प्राचीन व दुर्मिळ वस्तूंची प्रदर्शन, कृषि प्रदर्शन, सांस्कृतिक, साहित्यिक प्रदर्शन, वैज्ञानिक प्रदर्शन.

 •  विविध स्पर्धा परीक्षा (उदा. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग) संबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे.

 •  ग्रंथालयाची स्थापना करुन लोकांना विविध पुस्तके, ग्रंथ, वृत्तपत्रे यांची उपलब्धता करून देणे. वाचन संस्कृती वाढविणे.

 •  गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोई (कपडे, पुस्तके) देणे.

 •  बी.एस.डब्ल्यू. महाविद्यालयाची स्थापना करणे.

 •  युवक, युवतींना उच्च दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन करणे व सहाय्य करणे.

 • वरील सर्व उद्देश शासनाच्या संबंधित खात्याच्या पूर्व परवानगीने राबविणेत येतील.

            ♠ कला-

 • स्थानिक कला/लोककला यांचे जतन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे, तसेच स्थानिक कला, लोककलांच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करणे.

 • थोर राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या / पुण्यतिथ्या साजर्‍या करणे / सार्वजनिक उत्सव साजरे करणे.

 • बहू उद्देशीय सभागृहाची सोय मोफत उपलब्ध करून देणे व मार्गदर्शन करणे.

 • वरील सर्व उद्देश शासनाच्या संबंधित खात्याच्या पूर्व परवानगीने राबविणेत येतील.

♠ क्रीडा –

  • व्यायामशाळा, क्रीडांगण, क्रिडासंकुल उभारणे, चालविणे, खेडाळूंना व्यायामाच्या आत्याधुनिक व्यायाम सुविधा पुरविणे.

  • क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, कबड्डी, धावणे, लांब उडी, कुस्ती, हॉकी खेळांचा सराव करणे, खेडाळू तयार करणे, त्यांना मार्गदर्शन करणे.

  • वरील खेळांचा प्रचार व प्रसार करणे. खेळांच्या स्पर्धा भरविणे.

  • क्रीडा ग्रंथालय उभारणे,क्रीडा मेळावे, चर्चासत्रे, कार्यशाळा आयोजित करणे.

  • युवतींसाठी पोहणे, रोइंग, होडी शर्यती, गिर्यारोहन, रक्तदान, आरोग्य शिबीर असे उपक्रम राबविणे.

  • व्यायामाद्वारे योगवर्ग घेणे, व्यायामाचे तसेच योगाचे स्पर्धा घेणे.

 • वरील सर्व उद्देश शासनाच्या संबंधित खात्याच्या पूर्व परवानगीने राबविणेत येतील.

♠ वैद्यकीय

  • नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर इ. आयोजित करणे.

  • ग्रामीण भागातील आरोग्य सेवेत सुधारणा करणे बाबत मार्गदर्शन करणे.

  • एड्स ग्रस्तांसाठी देखभाल औषधउपचार, सल्लागार केंद्र, याबाबत माहिती देणे.

  • ब्लड बँक, रुग्णवाहिका इत्यादींची सोय उपलब्ध करून देणे.

  • ग्रामीण भागातील विशेष आरोग्य सेवा केंद्र मिळवून देणे, हॉस्पिटल ची निर्मिती करणे.

  • हेल्थ एज्युकेशन व कॅन्सर डिटेक्शन स्कीम या योजनेअंतर्गत आरोग्य शिक्षण उदा. धूम्रपान, मध्यपान, गुटखा, मावा इ. मादक द्रव्यांची अनिष्ठ परिणाम या विषयी आरोग्य शिक्षण व प्राथमिक अवस्थेतील कॅन्सर निदान इ.

  • नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्यांना आवश्यक ती सर्व मदत करणे.

  • महिलांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषध पुरवठा करणे.

  • गरीब गरजू कुटुंबांना औषधोपचारासाठी व शिक्षणासाठी फंड उपलब्ध करून देणे.

  • एका मुलावर ऑपरेशन करणार्‍या महिलांना आदर्श महिला पुरस्कार देणे.

  • संस्थेच्या वृध्दीकरिता गावोगावी शाखा सुरू करणे.

  • वरील सर्व उद्देश शासनाच्या संबंधित खात्याच्या पूर्व परवानगीने राबविणेत येतील.   

♠ कृषि –

 • ग्रामीण विकासासाठी विज्ञान, तंत्रज्ञान कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन करणे.

 • महिलांसाठी विज्ञान, तंत्रज्ञान योजना, नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन ग्रामीण महिलांचे जीवनमान अधिक सुसहाय्य करणे, महिलांना फळ प्रक्रिया, साठवणूक, तांदूळ, पडीक जमीन विकास, अन्न धान्य, रेशीम उद्योग, प्रशिक्षण, इ. सारख्या योजनेबाबत मार्गदर्शन करणे.

 • कमकुवत घटकांसाठी विज्ञान तंत्रज्ञान यात बादल करून समजातील विज्ञान, तंत्रज्ञानाच्या उपयोग करून त्यांचे जीवनमान अधिक सुसहाय्य बनविणे, उदा. परंपरागत पद्धतीने कार्य करणार्‍या ग्रामीण भागातील बलुतेदारांना, कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञान, अवजारे देवून त्यांचे कष्ट कमी करण्याचा प्रयत्न करणे, इ. सारख्या योजनेबाबत मार्गदर्शन करणे.

 • नाबार्ड व इतर शासकीय/निमशासकीय योजणासंबंधी मार्गदर्शन करणे.

 • शेळी, मेंढी, कुक्कुटपालन, गोशाळा व पशुपालन इत्यादी सारखे उपक्रम राबविणेबाबत मार्गदर्शन करणे.

 • वरील सर्व उद्देश शासनाच्या संबंधित खात्याच्या पूर्व परवानगीने राबविणेत येतील.

♠ युवक विकास उपक्रम –

 • धर्म, जात, पंथ असा कोणताही भेदभाव न ठेवता समजातील राष्ट्रीय भावना व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावण्यासाठी व परस्परामध्ये स्नेह, आपुलकी व प्रेम कायम राहावे यामध्ये कोणत्याही परिस्थितीत तेढ येऊ नये यासाठी परिसंवाद, मेळावे, चर्चासत्रे, परिषदा आयोजित करणे, मार्गदर्शन करणे.

 • समाजामध्ये शैक्षणिक व वैचारिक एकाग्रता निर्माण करणे, त्यासाठी समाजातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे.

 • समाजाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले त्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करणे व्यासनमुक्त समाज निर्मितीस हातभार लावले उदा. स्वच्छता मोहीम, व्यसनमुक्ती कार्यक्रम, जनजागृती, इ.

♠ पशुविषयक –

 • शेळ्या, मेंढया, कोंबडी, गायी, म्हशी, मासे, शहामृग, डुक्कर, ससे पालनाच्या संदर्भात समुपदेशन व मार्गदर्शन करणे.

 • तज्ञ व्यक्तीकडून पशू वैद्यकीय बाबतीत सल्ला देणे.

 • तज्ञ व्यक्तींकडून दूध उत्पादनाकरिता जनजागृती करण्यासाठी समुपदेशन व मार्गदर्शन देणे.

 • शेळ्या, मेंढया व इतर दूध उत्पादक पशूंचे दूध संकलन करून दूध प्रक्रिया व्यवसायाबाबत सल्ला व मार्गदर्शन करणे.

 • राज्य व केंद्र शासनाच्या अंतर्गत येणार्‍या पशु  वैद्यकीय योजना संदर्भात मार्गदर्शन करणे.

    ♠   वरील सर्व उद्देश शासनाच्या संबंधित खात्याच्या पूर्व परवानगीने राबविणेत येतील.

    ♠   वरील सर्व उद्देश ना नफा ना तोटा या तत्वावर धर्मादाय हेतूने राबविणेत येतील.