विज्ञान आणि संशोधन 


वरील उद्देशाला महाराष्ट्रातून इयत्ता 4 थी ते इयत्ता 12 वी पर्यंत राज्यातील प्रत्येक मराठी माध्यमाच्या शाळेतील (उदा. शासकीय, निमशासकीय, खाजगी) या प्रत्येक वर्गातील ज्या विद्यार्थ्याच्या अंगी वैज्ञानिक व संशोधन असे विविध शोध लावण्याची क्षमता आहे किंवा लावलेले आहे. अशा विद्यार्थ्यांना पुढील व्यासपीठ मिळण्यासाठी तालुका, जिल्हा, विभाग, राज्य पातळीवरुन ठराविक विद्यार्थ्याची निवड करून त्यांना पुढील शिक्षणासाठी गुरुकुल स्वरुपात शाळा कॉलेजस ची उभारणी करून त्यांना पुढील शिक्षणासाठी लागणारा सविस्तर खर्च या संस्थेमार्फत मोफत पुरविला जाईल.

उदा. एखादा विद्यार्थी संशोधनात किंवा वैज्ञानिक क्षेत्रात उत्तम आहे. अशा मुलाला त्या क्षेत्रात तरबेज ठेवण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळवून दिले जाईल. त्याचा संपूर्ण शिक्षण खर्च कार्तिकी प्रतिष्ठान या संस्थेमार्फत पुरविला जाईल.